मराठी शाळा (Marathi School)
नमस्कार,
मराठी शाळेत आपले स्वागत आहे. आपली मराठी शाळा २०१० मध्ये सुरु झाली. सध्या शाळेमध्ये आठ विद्यार्थी आहेत. बृहन महाराष्ट्र मंडळातर्फे (BMM) उपलब्ध अभ्यासक्रम आपण वापरत आहोत. बृहन महाराष्ट्र मंडळ आणि भारती विद्यापीठ (पुणे) यांच्या तर्फे मराठी परीक्षा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सद्या तीन परीक्षा आहेत. आपल्या शाळेतील काही विद्यार्थी पहिली परीक्षा उत्तीर्ण झाले असून ते दुसऱ्या परीक्षेची तयारी करीत आहेत, तर काही विद्यार्थी पहिल्या परीक्षेची तयारी करीत आहेत. सध्या आपल्या शाळेत दोन शिक्षक आहेत.
मराठी शाळा शाळकरी मुलांसाठी विनामूल्य आहे. या शाळेत दाखल होण्यासाठी मंडळाच्या सदस्यत्वाची आवश्यकता नाही.
दर रविवारी दुपारी १२:३० वाजता शाळा Jimmy B Keel लायब्ररीमध्ये भरते.
- सौ प्रज्ञा मुळे
 
 
 
शाळे संबंधी माजी अध्यक्षांचे मनोगत ...
 
"मंडळाची शाळा सुरु होऊन आता १ वर्ष पूर्ण होऊन गेले. परंतु विद्यार्ठींची संख्या ६-७ च्या वर जाताच नाही. मंडळी, आपल्या मराठी भाषेची जाणीव व तिची जोपासना करण्याची तळमळ खरंच आपल्यात आहे का? आज अनेकांच्या आजी-आजोबांकडून नातवंडे मराठी बोलन नाहीत अशी तक्रार ऐकायला मिळते. पालकांना मनापासून विनंती आहे कि आपल्या लहान मुलांना मराठी शाळेत येण्यासाठी प्रोत्साहन द्या. सध्याचे शाळेचे स्थळ, दूर अंतर ह्या सारख्या गोष्टी जर तुम्हाला परावृत्त करत असतील तर आनंदाची गोष्ट म्हणजे समितीने सर्व स्वयंसेवकांना (volunteers ) आवाहन केले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी मराठी शाळा सुरु करण्यात येतील. तसेच एक स्पष्टीकरण द्यावेसे वाटते की मराठी शाळा केवळ मायबोली मेलावाच्या सदस्यांसाठीच नसून सर्वांसाठी आहे. या शाळेत दाखल होण्यासाठी मंडळाच्या सदस्यत्वाची आवश्यकता नाही. तरी कृपया याची नोंद घ्यावी व आपल्या माहितीतील सर्व पालकांना हा निरोप द्यावा. इतके चांगले कार्य तुम्हा सगळ्यांच्या सहकार्याशिवाय चालविणे अशक्यच आहे."
 
- अविनाश बोरीकर, मायबोली मेळावा अध्यक्ष (२००१-२००२)
 
 
आपल्याला जर शाळेसंबंधी अजून माहिती पाहिजे असल्यास आम्हाला संपर्क साधा: This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.
 
 
 
 
"Marathi School" is the activity started by MMTB to promote the Marathi language among the young generation. This school is open for all school going children and membership of MMTB is not required. For more information, please contact: This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. .
 
 
You are here: Home मराठी शाळा