
तिथी-सणवार-दिनविशेष
टॅम्पा बे च्या स्थानिक वेळ आणि तिथी (EST) नुसार या वर्षी येणारे सण आणि उत्सव - लेखन -श्री. पाटील गुरुजी चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढी पाडवा दि ९/४/२०२४ मंगळवार* श्रीराम नवमी...१६/४/२०२४ मंगळवार हनुमान जयंती... २३/४/२०२४ मंगळवार अक्षय्य तृतीया...१०/५/२०२४ शुक्रवार नृसिंह जयंती....२१/५/२०२४ मंगळवार वटपौर्णिमा...२१/६/२०२४ शुक्रवार गुरु पौर्णिमा २०/७/२०२४ शनिवार नागपंचमी..९/८/२०२४ शुक्रवार रक्षाबंधन..१९/८/२०२४ सोमवार गोकुळ अष्टमी..२६/८/२०२४ सोमवार पोळा...२/९/२०२४ सोमवार हरितालिका... ५/९/२०२४ गुरुवार गणेश चतुर्थी पार्थिव पुजन ६-७/९/२०२४ शुक्रवार तसेच शनिवार सकाळपर्यंत ** गौरी आवाहन ९/९/२०२४ सोमवार अनंत चतुर्दशी १६/९/२०२४ सोमवार सर्वपित्री अमावस्या २/१०/२०२४ नवरात्रारंभ ३/१०/२०२४ गुरुवार विजयादशमी १२/१०/२०२४ शनिवार कोजागिरी पौर्णिमा १६/१०/२०२४ बुधवार नरकचतुर्दशी ३०/१०/२०२४ बुधवार लक्ष्मीपूजन ३१/१०/२०२४ गुरुवार बलिप्रतिपदा १/११/२०२४ शुक्रवार भाऊबीज २/११/२०२४ शनिवार चंपाषष्ठी ६/१२/२०२४ शुक्रवार दत्त जयंती १४/१२/२०२४ शनिवार
एप्रिल (मराठी महिना- चैत्र )
चैत्र महिन्यातील नवमी , प्रभू रामचंद्रांनी अवतार घेतला, या गोजिरवाण्या दिव्य बालकाचे दर्शन व्हावे म्हणून सर्व देव देवता वेगवेगळी रूपे घेवून दर्शनाला येवू लागले, ज्याला जसे दर्शन घेता येईल ते ते देव श्री रामाचे दर्शन घ्यायला येवू लागले .. सुर्यनारायण भगवान पण दर्शन घेवू लागले , इतके लोभस मोहक रूप पाहून भगवान सुर्यानारायणाचे समाधान होईना , त्या वेळी सुर्यभगवान आपल्या जागेवरून हालेचनात ... इतर सर्व देवता दर्शन घेवून जात होत्या , पण "चंद्र " मात्र दु:खी होता , सूर्य पुढे सरकेना त्यामुळे संध्याकाळ होईना , त्यामुळे चंद्राला दर्शन घेता येईना .. त्यांनी सूर्य नारायणाला खूप विनवण्या केल्या, पण सूर्य काही पुढे जाईना .. शेवटी चंद्राने राम प्रभूंना सांगितले कि सूर्याला पुढे सरकायला सांगा, पण सूर्य भगवान त्यांचे ऐकेनात , माझे समाधान झाले कि मी पुढे जाईन, असे म्हणू लागले .. रामप्रभूंनी चंद्राची समजूत घातली, व म्हणाले आज पासून माझ्या नावापुढे तुझे नाव लावले जाईल , "राम - चंद्र " , आणि माझ्या पुढल्या अवतारात तुला पहिले दर्शन होईल ... राम जन्म दुपारी झाला ... आणि पुढल्या अवतारात "श्री कृष्ण " जन्म मध्यरात्री झाला .. कृष्ण जन्म झाला तेंव्हा फक्त तिघे जागे होते .. देवकी - वसुदेव आणि चंद्र ...