top of page

तिथी-सणवार-दिनविशेष

टॅम्पा बे च्या स्थानिक वेळ आणि तिथी (EST) नुसार या वर्षी येणारे सण आणि उत्सव - लेखन -श्री. पाटील गुरुजी चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढी पाडवा दि ९/४/२०२४ मंगळवार* श्रीराम नवमी...१६/४/२०२४ मंगळवार हनुमान जयंती... २३/४/२०२४ मंगळवार अक्षय्य तृतीया...१०/५/२०२४ शुक्रवार नृसिंह जयंती....२१/५/२०२४ मंगळवार वटपौर्णिमा...२१/६/२०२४ शुक्रवार गुरु पौर्णिमा २०/७/२०२४ शनिवार नागपंचमी..९/८/२०२४ शुक्रवार रक्षाबंधन..१९/८/२०२४ सोमवार गोकुळ अष्टमी..२६/८/२०२४ सोमवार पोळा...२/९/२०२४ सोमवार हरितालिका... ५/९/२०२४ गुरुवार गणेश चतुर्थी पार्थिव पुजन ६-७/९/२०२४ शुक्रवार तसेच शनिवार सकाळपर्यंत ** गौरी आवाहन ९/९/२०२४ सोमवार अनंत चतुर्दशी १६/९/२०२४ सोमवार सर्वपित्री अमावस्या २/१०/२०२४ नवरात्रारंभ ३/१०/२०२४ गुरुवार विजयादशमी १२/१०/२०२४ शनिवार कोजागिरी पौर्णिमा १६/१०/२०२४ बुधवार नरकचतुर्दशी ३०/१०/२०२४ बुधवार लक्ष्मीपूजन ३१/१०/२०२४ गुरुवार बलिप्रतिपदा १/११/२०२४ शुक्रवार भाऊबीज २/११/२०२४ शनिवार चंपाषष्ठी ६/१२/२०२४ शुक्रवार दत्त जयंती १४/१२/२०२४ शनिवार

​जानेवारी (मराठी महिना- माघ )

फेब्रुवारी (मराठी महिना- माघ) 

माहितीपर लेख - उत्तरा भालेराव 

​एप्रिल   (मराठी महिना- चैत्र   )

चैत्र महिन्यातील नवमी , प्रभू रामचंद्रांनी अवतार घेतला, या गोजिरवाण्या दिव्य बालकाचे दर्शन व्हावे म्हणून सर्व देव देवता वेगवेगळी रूपे घेवून दर्शनाला येवू लागले, ज्याला जसे दर्शन घेता येईल ते ते देव श्री रामाचे दर्शन घ्यायला येवू लागले .. सुर्यनारायण भगवान पण दर्शन घेवू लागले , इतके लोभस मोहक रूप पाहून भगवान सुर्यानारायणाचे समाधान होईना , त्या वेळी सुर्यभगवान आपल्या जागेवरून हालेचनात ... इतर सर्व देवता दर्शन घेवून जात होत्या , पण "चंद्र " मात्र दु:खी होता , सूर्य पुढे सरकेना त्यामुळे संध्याकाळ होईना , त्यामुळे चंद्राला दर्शन घेता येईना .. त्यांनी सूर्य नारायणाला खूप विनवण्या केल्या, पण सूर्य काही पुढे जाईना .. शेवटी चंद्राने राम प्रभूंना सांगितले कि सूर्याला पुढे सरकायला सांगा, पण सूर्य भगवान त्यांचे ऐकेनात , माझे समाधान झाले कि मी पुढे जाईन, असे म्हणू लागले .. रामप्रभूंनी चंद्राची समजूत घातली, व म्हणाले आज पासून माझ्या नावापुढे तुझे नाव लावले जाईल , "राम - चंद्र " , आणि माझ्या पुढल्या अवतारात तुला पहिले दर्शन होईल ... राम जन्म दुपारी झाला ... आणि पुढल्या अवतारात "श्री कृष्ण " जन्म मध्यरात्री झाला .. कृष्ण जन्म झाला तेंव्हा फक्त तिघे जागे होते .. देवकी - वसुदेव आणि चंद्र ...

​मे    (मराठी महिना- चैत्र - वैशाख  )

​लेखन: पाटील गुरुजी 

एकादशी हा हिंदू आणि जैन संस्कृतीत एक शुभ दिवस मानला जातो. एकादशी प्रत्येक महिन्यातील (कृष्ण आणि शुक्ल पक्ष) पक्षच्या प्रत्येक अकराव्या दिवशी येते. आध्यात्मिकदृष्ट्या, एकादशी अकरा इंद्रियांचे प्रतीक आहे ज्यामध्ये पाच ज्ञानेंद्रिये, पाच क्रिया इंद्रिये आणि एक मन आहे. एकादशीच्या दिवशी अकरा इंद्रियांवर नियंत्रण ठेवून आणि फक्त सात्विक असलेले अन्न सेवन करून उपवास करतात. 12 महिने आणि प्रत्येक महिन्यात दोन वेळा एका वर्षात एकूण 24 एकादशी होतात, त्या सर्व भगवान विष्णूच्या विविध अवतारांशी संबंधित असतात. दर तीन वर्षांनी अधिक मासमुळे आणखी दोन अतिरिक्त एकादशी येतात.
           एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा करणे आरोग्य, संपत्ती आणि स्थिर संतुलनासाठी खूप फायदेशीर आहे. प्रत्येक एकादशीला उपवास करताना काही नियम असतात, ज्यांचे पालन मानसिक ऊर्जा योग्य दिशेने करण्यासाठी आणि वाईट कर्मांपासून दूर राहण्यासाठी केले पाहिजे. सर्व एकादशी नावाप्रमाणे विशेष फलदायी आहेत.

bottom of page